घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन नराधमाचा विवाहितेवर बलात्कार पोलीसांनी आरोपीस केली अटक

Friday, December 27, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
येथील शाहआलम नगर भागात आज रात्री १ वाजता घरात महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना शहरात घडली.    पोलीसांनी डिगंबर साखरलाल महाजन आरोपीस अटक केली आहे. 
    या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, संबंधित पीडित महिला हीचा पती ड्रायव्हर असून तो काही काळ कामानिमित्त बाहेर असायचा.असाच एक प्रसंग आज रात्री आला.तो बाहेर गावी त्याच्या वैयक्तीक कामासाठी गेला असता. त्याचा फायदा घेऊन आरोपी याने रात्री पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या घरचा दरवाजा ठोठावला. तिने आपला पती आला असेल या भ्रमाने दरवाजा उघडला. तर तिच्या समोर गल्लीत राहत असलेला आरोपी होता. त्याने घरात घुसून दरवाजा बंद केला व तिच्या सोबत बळजबरी करीत बलात्कार केला. संबंधित महिलेने आरोळ्या मारू नये म्हणून तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिने आरडा ओरड केला असता शेजारील लोकांनी त्याला पकडून मारहाण केली. व त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान भादवी कलम ४५२,३७६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन.आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines