========================================
===========================================
अमळनेर - उद्या दिनांक २६ मार्च रोजी फक्त दोन तासासाठी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत या कालावधीत अमळनेर शहरातील ३३/११ के.व्ही. उपकेंद्र येथील अत्यंत आवश्यक असलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकरिता विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे पुढील २१ दिवसांच्या संचार बंदीच्या कालावधीत नागरिकांना अखंडित विद्युत सेवा देणे शक्य होणार आहे. तरी उद्या विज सेवा बंद असलेल्या कालावधीत ग्राहकांनी विज कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अमळनेर शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
No comments
Post a Comment