=======================================
===========================================
अमळनेर- येथील स्टेशन रोड वरील नपा मालकीच्या हशमजी प्रेमजी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील मागील बाजूस पोलीसांनी छापा टाकून ११७० रुपयांच्या ९ दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचीअधिक माहिती अशी की दि.२४ रोजी संपूर्ण देशात जनता कर्फ्यु होता.कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. याच दरम्यान दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास शहरातील हशमजी प्रेमजी मार्केट मधील मागील बाजूस दीपक बाबूलाल भावसार याच्याकडे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील ,संजय पाटील ,दीपक माळी , सुनील हटकर यांनी छापा टाकला असता त्याच्याजवळ ११७० रुपयांच्या एकूण ९ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यांच्याविरुद्ध दारूबंदी कायदा कलम ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुनील पाटील करीत आहेत.
No comments
Post a Comment