-------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्य सेवा परिक्षेचा निकाल नुकताच लागला. यात अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील कु. मानसी पाटील या युवतीने उज्वल यश संपादन केले असून संपूर्ण राज्यात मुलींमधून पहिली येण्याचा बहुमान मिळविला आहे.भाजपा नेत्या मा.आ.स्मिताताई वाघ यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.
कु.मानसी पाटील ही जवखेडे येथील रहिवासी व जळगाव येथे शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या श्री सुरेश पाटील यांची मुलगी आहे. तिची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. यानिमित्त मा.आ.स्मिताताई वाघ यांनी तिची भेट घेऊन सन्मान केला, अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माझ्या तालुक्यातील सामान्य कुटुंबातील मुलगी अभ्यास व परिश्रमांतून प्रशासकीय सेवेत उच्च पदावर पोहोचली आहे याचा मला विशेष आनंद आहे असे गौरवपूर्ण उद्गार मा.आ.स्मिताताई वाघ यांनी काढले. यावेळी कु.मानसीचे आई - वडील,परिवारातील सदस्य,भाजपा पदाधिकारी राकेश पाटील,राहुल चौधरी,श्रीनाथ पाटील,भुषण जैन हे उपस्थित होते.
No comments
Post a Comment