------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन म्हणून राज्यातील सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले आहे. त्यानिमित्त परिसरातील विविध मान्यवरांनी मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांचा सत्कार केला. सन २०१९ या वर्षात महाराष्ट्रातुन टाॅपर होत मारवड पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशनचा बहुमान मिळाला आहे. सन २०१९ मध्ये स.पो.नि. समाधान पाटील व १ जुलै २०१९ पासून आतापर्यंत स.पो.नि. राहुल फुला हे या पोलिस ठाण्याची धुरा सांभाळत आहेत. सदर बहुमान मिळाल्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांकडून येथील पोलिस कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काल दि. २९ रोजी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांचा पुषपगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार केला.

यावेळी मारवड ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष एल.एफ.पाटील, पत्रकार डॉ. विलास पाटील, चव्हाण रावसाहेब, एम.के.पाटील, के.व्ही.पाटील, प्रशांत साळुंखे तसेच सामाजिक कार्यकर्ते उमाकांत भाऊसाहेब, व धार येथील माजी उपसरपंच अलीम मुजावर यांनी सत्कार केला. यावेळी मारवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी रोहिदास जाधव, फिरोज बागवान, सुनील तेली, सुनील अगोने यासह होमगार्ड बांधव उपस्थित होते.
No comments
Post a Comment