-------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील कावपिंप्री शिवारात अवैध पद्धतीने मुरूम वाहतूक करणा-या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यास गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील तलाठ्यांवर हल्ला प्रकरणातील फरार आरोपीस आज पहाटे पोलीसांनी अटक केली. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा नंबर ४३९/२०२० भादवि ३०७, ३५३, ३३२ व ३७९ प्रमाणे या गुन्ह्यात असलेला मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनू पारधी व जेसीबी वाहन चालक श्याम राजेंद्र चव्हाण हे फरार होते. यांनी कारवाईसाठी गेलेल्या पथकातील तलाठ्यांवर ट्रॅक्टर घालून हल्ला चढवला होता.त्यानंतर ते फरार झाले होते.या आरोपींना अटक व्हावी म्हणून अमळनेर व चोपडा तलाठी यांच्या संघटनेने लेखणी बंद पुकारले होते. त्या अनुषंगाने तात्काळ दखल म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या पथकाने मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनवणे यांची माहिती तांत्रिक स्वरूपाची तसेच गोपनीय बातमीनुसार आरोपी याच्या लोकेशन वरून पकडण्यासाठी पारोळा हद्दीतील बहादरपुर गावाजवळ सकाळी ०३:०० वाजता त्यास ताब्यात घेण्यात आले.आरोपीस पोलीस कोठडी
सदर घटनेतील आरोपीस आज अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
No comments
Post a Comment