------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार होता. काही दिवसांपुर्वी सदर पदभार काढण्यात आला. याबाबत ग्राम पातळीवरील लोकप्रतिनिधी व नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. संदीप वायाळ यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार पुन्हा देण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे. याबाबत सामूहिकपणे जिपच्या वरिष्ठांकडे भुमिका मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर अल्पावधीतच संदीप वायाळ यांनी अतिशय प्रभावी कामाचा ठसा प्रशासनात उमटविला आहे. ग्रामीण भागातील प्रश्न तातडीने सोडविणे,लोकहिताचे धडाकेबाज निर्णय घेणे यामुळे ते तालुक्यात लोकप्रिय बनले होते.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत तर त्यांचे काम खरोखरच वाखाणण्याजोगे होते. अमळनेर पं.स.चे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण भागातील सरपंच,ग्रा.पं.सदस्य, इतर लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यात समन्वय साधून विकासाभिमुख निर्णय घेण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा अधिका-याकडे पुन्हा गटविकास अधिकारी पदाचा पदभार सोपवावा अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
No comments
Post a Comment