------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरातील न्यु प्लॉट भागातील शिवाजी बगिचा जवळील रहिवासी जगदीश शामकांत आठवले (वय-४६) यांचे काल दि.१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव येथे रूग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अमळनेर येथून जळगांव येथे उपचारासाठी रुग्णवाहिकेने नेत असतांना रस्त्यातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. जळगांव जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटूंबिय व मित्र परिवारास मोठा धक्का बसला आहे.
मित्रांचा मोठा गोतावळा
जगदीश आठवले यांचे अमळनेर बसस्थानकासमोर हॉटेल पुष्पराज नावाचे हॉटेल होते. याशिवाय ते सामाजिक कार्यात सहभागी होते. न्यु प्लॉट भागातील शिवसेनेचे शाखाप्रमुख, ब्राह्मण युवा मंचचे ते क्रियाशील पदाधिकारी होते. विविध क्षेत्रातील मित्रांचा मोठा गोतावळा त्यांनी जमवला होता. याशिवाय पोलीस मित्र म्हणुनही ते परिचित होते. अचानक घडलेल्या या घटनेने अनेकांना धक्का बसला असुन सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार असुन शहरातील कमल भोजनालयाचे कृष्णकांत (आप्पा) आठवले यांचे ते चुलत बंधु होत.
अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे स्व. जगदीश आठवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
No comments
Post a Comment