---------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
अमळनेर - देशात पेट्रोल व डिझेलची होणारी दरवाढ रद्द करून माफक दरात ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन लागू झाले होते.उद्योग - व्यवसाय सर्व बंद असल्याने नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.यातच होणारी दरवाढ जनतेला जादा भुर्दंड देणारी ठरत आहे. नागरिकांना दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असतांना देशात मागील काही दिवसात या किंमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शासनाने कमीत कमी किंमतीत नागरिकांना पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे. शासनाने या मागणीचा गंभीरपणे विचार करून तातडीने कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. अमळनेर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार श्री पवार साहेब यांना डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात निवेदन देण्यासाठी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे,महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचनाताई वाघ, शहराध्यक्ष नगरसेवक मनोज पाटील, प्रा. सुभाष पाटील,माजी शहराध्यक्ष मुन्ना शर्मा आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment