चौधरी वाड्यातील ९२ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात नागरिकांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागत

Thursday, July 2, 2020

/ by Amalner Headlines
----------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------
अमळनेर - 
शहरातील चौधरी वाडा भागातील ९२ वर्षाचे आजोबा व शिव कॉलनीतील ७६ वर्षीय आजोबा या दोघांनी आज कोरोनावर मात करीत बरे होवून घरी परत आले आहेत. कोरोनाची
 रूग्ण संख्या व मृत्यूची संख्या वाढत असली तरी कोरोनामूक्त होणारे देखील बऱ्यापैकी आहेत ही समाधानाची बाब आहे. 
             माळी वाडा परिसरातील चौधरी वाडा येथील ९२ वर्षीय वृध्दाने आज कोरोनावर विजय मिळवला. त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रभागातील नागरीक व नगरसेविका सौ.रत्नमाला महाजन,श्री.साखरलाल महाजन सर,रघुनाथ सुकदेव महाजन व मालुबाई,नवसाताई,सुमनताई,सुनंदाबाई,रंजनाबाई,संगीताताई,आशाबाई,रत्नाताई,आबाजी,प्रकाशआप्पा,सुहासबापू,रघुनाना,विशाल,समाधान,योगेश तुषार व मित्र परिवाराने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यांना दि. १० जून रोजी अमळनेर येथे कोविड सेंटरला दाखल करण्यात आले होते. दि. ११ जून रोजी जळगांव येथे दवाखान्यात दाखल केले व त्यांचा नातू तुषार याने त्यांची विशेष काळजी घेतली.
           तर शिव कॉलनीतील ७६ वर्षीय आजोबा १५ दिवसांपूर्वी पॉझीटीव्ह आले होते. त्यांचेवर चोपडा ऊप जिल्हा रूग्णालयात ऊपचार सुरू होते. ते देखील कोरोनावर मात करीत ऊपचार घेवून घरी परतले. त्यांचे परिसरातील नागरीकांनी टाळ्या वाजवून व फूलांचा वर्षाव करीत स्वागत केले.यावेळी परिवारातील सदस्य व नागरीक ऊपस्थीत होते.
-----------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन


No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines