अमळनेर - तालुक्यातील कळमसरे येथील ४४ शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आधार प्रमाणिकरण करूनही अनेक दिवसांपासून महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता. या शेतक-यांनी आमदार अनिल पाटील हे कळमसरे आले असता त्यांच्याकडे आपल्या व्यथा निवेदनाद्वारे मांडल्या. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत त्या ४४ शेतकऱ्यांसह ज्यांचे ठसे आधार प्रमाणिकरणासाठी आले नाहीत त्या ९ अश्या एकूण ५३ शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची कर्जमाफी मिळवून देऊन दिलासा दिला.कर्जमाफीचा लाभ मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आमदार अनिल पाटील व जि.प.सदस्या जयश्री पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या सन २०१९ - २० या वर्षातील महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून कळमसरे येथील एकूण ४४ शेतकऱ्यांनी दिनांक १ मार्च रोजी आधार प्रमाणिकरण करावयाच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन आधार प्रमाणिकरण केले होते. तर ९ शेतकऱ्यांचे ठसे आले नसल्याने त्यांना ही जुलै महिना संपत आला तरी यातील एकाही शेतक-यास कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही व नवीन कर्ज देखील उपलब्ध होत नसल्याने संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले होते.
आ. अनिल पाटील हे कळमसरे येथे भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आले असता संबंधितशेतकऱ्यांनी निवेदन व सविस्तर यादी निहाय प्रकरण आमदारांना सादर केले.
आमदार पाटील यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांची कानउघडणी करून अवघ्या पाच दिवसात संपूर्ण ५३ शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांची यादी मंजूर करण्यात यश मिळवले व कर्जमाफीचा लाभ मिळवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
डांगरी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून रस्ता केला मोकळा
कळमसरे जळोद गटाच्या जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने कळमसरे-डांगरी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून देत शेतकऱ्यांना संपूर्ण रस्ता वापरासाठी मोकळा करून दिल्याबद्दल जयश्री पाटील व आमदार अनिल पाटील यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून कळमसरे येथील शेतकऱ्यांनी आमदारांच्या घरी जाऊन जाहीर सत्कार केला. यावेळी जि.प सदस्या जयश्री पाटील, माजी उपसरपंच जितेंद्र राजपूत, ज्येष्ठ नागरिक अशोक चौधरी, झुलाल चौधरी, पौलाद वैराळे, हिरालाल चौधरी, धनराज चौधरी, संजय चौधरी, बाबुलाल पाटील, भागवत कोळी, प्रदीप महाजन, जितेंद्र महाजन, नंदू शर्मा, नारायण सुतार, अंबालाल पाटील, भटू कुंभार, चेतन चौधरी, बन्सीलाल पाटील, मधुकर चौधरी, गुलाब पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
No comments
Post a Comment