अमळनेर - येथील पुरातन वास्तू व शहराचे वैभव असलेला दगडी दरवाजा संगोपनासाठी नपाकडे हस्तांतरीत करावा अशी मागणी नगर परिषदेने शासनाच्या पुरातत्व विभागाकडे केली होती. या बाबतीत पाठपुरावा केल्यानंतर संबंधित विभागाने दगडी दरवाजा संगोपनासाठी नपास देण्यास मान्यता दिली आहे. याबाबतची कार्यवाही नपाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्रमाक्र. २०२०/प्र. क्र. ३० / सां. का. -३, मंत्रालय, मुंबई दिनांक २६ जून २०२० अन्वये अमळनेर वेस, जि. जळगांव हे राज्य संरक्षित स्मारक अमळनेर नगर परिषदेस महाराष्ट्र वैभव - राज्य संरक्षित स्मारक योजने अंतर्गत १० वर्षे संगोपनार्थ देण्या बाबतच्या करार नाम्यावर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, आणि मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या स्वाक्षरी करून वास्तू विशारद श्री. चेतन सोनार, चेतनभाई शहा, यांच्याकडे मा. संचालक,पुरातत्व व वस्तू संग्रहालय,संचालनालय, मुंबई यांना सुपूर्द करण्यासाठी करार नामा देण्यात आला. यावेळी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे सोबत नगरसेवक प्रा. रामकृष्ण पाटील, श्याम पाटील, बाबू साळुंखे, विक्रांत पाटील, नगर अभियंता संजय पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी,हरीश पाटील, व मिलिंद चोधरी आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment