अमळनेर - तालुका शिवसेना संघटकपदी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश प्रभाकरराव देशमुख (गांधली) यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत व जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या आदेशाने तालुका प्रमुख विजय पाटील यांनी केली आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी तालुकाप्रमुख विजय पाटील व शहरप्रमुख यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र दिले.
नूतन तालुका संघटक महेश देशमुख हे बाजार समितीचे संचालक असून गांधली विकासो चे चेअरमन आहेत. खा.शि. मंडळाचे माजी अध्यक्ष ,माजी नगरसेवक आदी पदांवर कार्य केले असून ग्रामीण भागात परिचित आहेत. श्री महेश देशमुख यांच्या नियुक्तीचे महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वछता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील,अमळनेर विधानसभा संपर्कप्रमुख दिपक पाटील,उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, माजी उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र देशमुख,माजी शहरप्रमुख नितीन निळे,व प्रताप शिंपी ( नगरसेवक) मा. नगरसेवक राजू फापोरेकर,महिलाआघाडी उपजिल्हा संघटिका मनिषा परब, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, उपतालुका प्रमुख चंदू पाटील, शिवकुमार पाटील, विलास पवार, उपशहरप्रमुख जिवन पवार,मोहन भोई,शिव वाहतुक सेना तालुका अध्यक्ष रमेश पाटील,शहर अध्यक्ष विनोद राऊळ, शिक्षक सेना तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, रामचंद्र परब,शहर संघटक चंद्रशेखर भावसार, व्यापारी सेनेचे जितेंद्र झाबक , विमल बाफना आदींनी अभिनंदन केले आहे
No comments
Post a Comment