दगडी दरवाजाच्या बुरुजाचा भाग क्षतीग्रस्त झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक इतरत्र वळवा अवजड वाहतुकीमुळे नवीन रस्त्याची लागते वाट - नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील

Friday, July 31, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
जुन्या अमळनेर शहराची वेस म्हणून ओळख असलेल्या दगडी दरवाजा या राज्य संरक्षित स्मारकाच्या बुरुजाचा भाग क्षतीग्रस्त झाल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा  राज्यमार्ग १५ वरील वाहतुक इतर मार्गाने वळविण्याबाबत त्वरित निर्णय घ्या अशी मागणी अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
                 अवजड वाहतुकीमुळे पालिका हद्दीतील नवीन रस्त्याची वाट लागत असल्याने नगराध्यक्षा सौ.पाटील यांनी हे निवेदन वजा पत्र दिले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की अमळनेर येथील (दगडी दरवाजा ) हे शासन निर्णय दिनांक १५ जानेवारी १९७० रोजी राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेले आहे. अमळनेर शहरातील मध्यभागातून जाणारा मेहेरगांव धुळे - अमळनेर चोपडा खरगोन राज्य मार्ग १५ हा महाराष्ट्र मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मुख्य रस्त्यावरील रहदारीच्या भागात उपरोक्त वेस (दगडी दरवाजा ) आहे. त्यामुळे नागरीक व वाहनधारक यांची मोठया प्रमाणात वर्दळ असते.  शिवाय रस्ता वाहतूकीच्या तुलनेने फारच अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कायम कोंडी होत असते. अमळनेर वेस, (दगडी दरवाजा ) बुरुजाचा भाग दिनांक २४ जुलै २०१९ पासून स्थिती धोकादायक असून कुठलीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर राज्यमार्गावरील मुख्य रस्त्यावर १४ मीटर रुंदीचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असल्यामुळे या राज्य मार्गावरील पर्यायी वाहतूक व्यवस्था शहरातील रस्त्यावरुन केल्यामुळे सदर शहरातील रस्त्यांची वाहन क्षमता ६ ते ८ टनापर्यत असल्यामुळे सदर रस्त्यावरुन परिमाणापेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक होत असल्याने भारतीय रस्ते परिसर (आयसीआर) नुसार एक्सल लोड झाली असून पावसामुळे रस्ते दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहेत, यामुळे ही बाब नागरिकांच्या दृष्टीने निश्चितच योग्य नाही. यासाठी अमळनेर वेस, (दगडी दरवाजा ) या राज्य संरक्षित स्मारकाच्या बुरुजाचा भाग पावसामुळे क्षतीग्रस्त झाल्यामुळे राज्य मार्गावरील वाहतूक अमळनेर न पाच्या कमी परिणामांच्या रस्त्यावरून जात परिणामाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे  खराब झालेल्या रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करुन रस्ता दुरुस्तीसाठी सा.बा.विभाग अमळनेर यांच्या मार्फत नवीन रस्ता करून मिळावा. त्यानंतरच वाहतुकीचा निर्णय घ्यावा अन्यथा जड वाहतूक इतरत्र वळविण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांनी केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines