अमळनेर - येथील बाहेरपूरा भागातील राजे संभाजी मित्र मंडळ व शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने पैलाड स्मशानभूमी येथे पाण्याची टाकी भेट देण्यात आली.
अमळनेर शहरातील चोपडा रोड लगत असलेल्या स्मशान भूमीत शहरातील बहुतांश अंत्यविधी केले जातात.भरपूर दिवसांपासून स्मशान भूमीत असलेली पाण्याची टाकी पूर्णतः जीर्ण झाल्याने त्यात पाणी संकलित होत नव्हते. त्यामुळे अंत्यविधी व दशक्रिया विधीच्या वेळेस नागरिकांचे खुपच हाल होत असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना लक्षात आले.
त्यास अनुसरून सामाजिक बांधिलकी जपणारे मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकजभाऊ चौधरी यांच्या सहकार्याने राजे संभाजी मित्र परिवार,शिवशक्ती मित्र परिवार यांच्या मार्फत स्मशान भूमीत ५०० लिटर पाण्याची टाकी सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे कैलास पाटील,विजय चौधरी,आबा साळी,विष्णू पाटील, राकेश चौधरी,रवींद्र चौधरी, स्वामी चौधरी,रुणाल पाटील,भूषण अहिरराव, चेतन चौधरी,
जयेश चौधरी, गणेश मेंबर,अमोल चौधरी,प्रशांतभाऊ पाटील,जयेश चौधरी,तुषार चौधरी,राहुल मराठे,फरहान शेख(मुन्ना),
असलम बागवान,आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते .
No comments
Post a Comment