कृषीमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा - २७ ते ३० जुलै दरम्यान ७०० टन युरिया प्राप्त होणार आमदार अनिल पाटील यांनी घेतली कृषी अधिकाऱ्यांची बैठक

Saturday, July 25, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी आज सायंकाळी त्यांच्या  निवासस्थानी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी भरत वारे व पंचायत समिती कृषी अधिकारी अमोल भदाणे यांच्याकडे युरियाचा पुरवठा व उपलब्ध साठा या बाबतीत आढावा घेतला.या आढावा बैठकीत कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवर चर्चा करण्यात आली, त्यावर त्यांनी तातडीने दखल घेऊन अमळनेर तालुक्यासाठी ७०० टन युरिया तालुक्यासाठी २७ ते ३० जुलै दरम्यान प्राप्त होणार आहे.
सध्या युरिया टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांचा हंगाम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात असून सध्या युरियाची टंचाई सुरू आहे. कारखान्यांमध्ये हमाली काम करणारे इतर राज्यातील कामगार कोरोनामुळे मुळगावी परतले होते. त्यामुळे युरिया प्राप्तीसाठी विलंब झाला आता हळूहळू युरियाची स्थिती पूर्वपदावर येत असून २७ जुलै रोजी आर.सी.एफ चा ४०० टन युरिया प्राप्त होणार आहे तर ३० जुलै रोजी २०० टन नर्मदा व १०० टन इफफो आणि सम्राट या कंपन्यांकडून युरिया प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना पुरेपूर युरिया उपलब्ध होईल व ३० जुलै पर्यंत युरिया देण्याचे कृषीमंत्री दादा भुसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines