अमळनेरात बनावट दारू व दूध कारखाना उद्ध्वस्त - सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना अटक जळगाव एल.सी.बी. व अमळनेर पोलीसांची कारवाई

Wednesday, July 29, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - 
शहरातील ढेकू रोड वरील जय योगेश्वर काॅलनीत एका घरात बनावट दूध व दारूचा अवैध कारखाना सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यावर एलसीबी  जळगाव व अमळनेर पोलीसांनी  संयुक्तरित्या कार्यवाही करत  लाखोंचा माल जप्त केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
*मॅकडॉल* -  ९ पेट्या १ नग - १५० रूपये प्रमाणे 
४३२ × १५० = ६४,८०० रूपये
*आय बी*- १७ पेट्या १ नग किंमत १४० रूपये प्रमाणे
८१६ X १४० = १४,२४० रूपये
*मोटर सायकल* 
*अॅक्टीव्हा*– ४५,००० रूपये
*स्प्लेंडर* ४०,००० रूपये -  *एकूण* ८५,००० रूपये 
*लिकावडे* २०० लिटर ड्रम
१५००० रू. प्रमाणे,
*स्पिरीट* ३ ड्रम प्रत्येकी
 ३५०० × ३ = १५,०००
*दुधाचे कॅन* ४००० प्रमाणे
१०५००प्रमाणे 
*अल्युमिनियम*  २००० रूपये
*इतर मुद्देमाल* ७३६० रूपये
*दूध बनविण्याचे मशीन* १५००० रूपये
असा एकूण ३ लाख ११,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी विजय अमृत पाटील, शिवाजी मन्साराम पाटील,सीमा विजय पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
यांनी केली कार्यवाही
               ही कार्यवाही करतांना एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक बापू .जे .रोहम, अमळनेरचे   पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,
हे.कॉ. दीपक विसावे,पो.ना. डॉ. शरद पाटील, दीपक माळी, भटूसिंग तोमर, रवींद्र पाटील,
हितेश चिंचोरे,रेखा ईशी, एल.सी.बी.चे सुधाकर लोहेरे, नारायण पाटील,रामचंद्र बोरसे,मनोज दुसाने,दीपक पाटील,दिपक शिंदे,परेश महाजन,कैलास पाटील इ.पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines