मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा रक्तदान,वृक्षारोपण या उपक्रमांचे शिवसेनेकडून आयोजन

Tuesday, July 28, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे संयमी, कणखर नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवसउपजिल्हा प्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजू मास्तर व शहर प्रमुख संजय पाटील यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करणेत आला.
                सकाळी १० वाजता शहरातील रक्तपेढीत तालुका प्रमुख विजय पाटील व शहर ,
ग्रामीण भागातील पदाधिकारी यांनी रक्तदान केले. त्यानंतर शहरातील गळवाडे रस्त्यावरील मिल चाळ भागांतील कोविड सेंटर जवळील वस्ती व धार्मिक शिव मंदिर स्थळाजवळ सॅनिटाइझर फवारणी करून वृक्षारोपण करणेत आले. दुपारी ग्रामीण भागातील मांडळ गावात ११० वृक्षांचे प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत,कब्रस्तान,व कॉलनी भागांत वृक्षारोपण करण्यात आले.  तसेच चौबारी गावातही रस्त्यालगत वृक्षारोपण करणेत आले. सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या शुभहस्ते माजी तालुकाप्रमुख स्व.अनिल पाटील यांच्या मंगरूळ गांवातील स्व. अंबर राजाराम पाटील माध्यमिक शाळेत वृक्षारोपण करून दिवसभरातील कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
        सदर कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या जिल्हा उप संघटिका सौ मनिषा परब,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत अनिल पाटील, माजी शहरप्रमुख नितीन निळे,व नगरसेवक प्रताप शिंपी, मार्केट संचालक महेश देशमुख, महिलाआघाडी तालुका संघटिका सौ. संगीता शिंदे,शहर संघटिका सौ.उज्वला कदम,सौ.ज्योतिर्मयी दिलीप सोनवणे, कु.डॉ.संबोधी सोनवणे, उपशहरप्रमुख जिवन पवार,माजी नगरसेवक राजू फापोरेकर, शिक्षक सेना तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष रमेश पाटील,शहर अध्यक्ष विनोद राऊळ, जेष्ठ शिवसैनिक रामचंद्र परब,शाखाप्रमुख विजय नवल पाटील,भरत जाधव, सुदर्शन पवार,शाखाप्रमुख मांडळ येथील कैलास पाटील, इब्राहिम खाटिक, महिला आघाडीच्या सर्व  पदाधिकारी,मंगरूळ शाळेतील शिक्षक वृंद,तसेच शहरातील व ग्रामीण भागातील शाखाप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines