अमळनेर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. आज बुधवार दि. २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वी ची परीक्षा घेण्यात आली होती.
दहावीचा निकाल कसा पाहू शकता ?
www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर निकाल पाहू शकता,तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. विद्यार्थी व पालकांनी वरील वेबसाईटवर दु. १ वाजेनंतर आपला निकाल पहावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment