सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन रद्द

Friday, July 17, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------
        - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------
जळगाव -
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे याची संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी नोंद घ्यावी असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
     जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जळगाव यांच्यामार्फत समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यासाठी महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना महणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.
           सध्या करोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता दि. २० जुलै २०२० रोजीचा लोकशाही दिन रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
-------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines