स्वयंस्फुर्तीने कोविड सेंटरमध्ये सेवा देणारे मायक्रो बायोलॉजिस्ट प्रियंका लधानी व श्याम पाटील यांचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद

Thursday, July 23, 2020

/ by Amalner Headlines
-----------------------------------------------------------------------
         - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील कोविड केअर सेंटरमध्ये २ मायक्रो बायोलॉजिस्टने स्वयंस्फुर्तीने आपली सेवा दिली आहे. रूग्णांच्या आजाराचे निदान करणारी तपासणी करण्यात महत्वाची भुमिका बजावण्याचे  योगदान या भूमिपुत्र मायक्रो बायोलॉजिस्टने आपल्या कामातून दिले आहे.
  
श्याम पाटील
         सध्या मुंबईत नोकरीस पण मुळचे अमळनेर येथील असलेले श्याम पाटील हे या सुट्टी दरम्यान अमळनेरला आलेले होते. कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर सुरूवातीला २० दिवस त्यांनी येथील कोविड सेंटरमध्ये काम केले.
प्रियंका प्रकाशलाल लधानी
           या वर्षी एम.एस्सी द्वितीय वर्ष या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी प्रियंका प्रकाशलाल लधानी ही देखील स्वयंस्फुर्तीने कोविड केअर सेंटरमध्ये सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. सामान्य कुटुंबातील असलेली प्रियंका लधानी ही येथीलच रहिवासी असून ती आजतागायत सेंटर मधील डॉक्टरांच्या सुचनेनुसार येथे काम करत आहे. येथील सेंटर मध्ये येणाऱ्या संशयित रुग्णांचे घश्याचे नमुने घेणे,ते तपासणीसाठी पाठवणे  व इतर वैद्यकिय सेवेशी संबधित कामात मदत करण्याचे काम प्रियंका  करत आहे. जेव्हा जाहिरात काढून कोरोनाच्या भीतीने पदे भरली जात नाही  अशा वेळी स्वतः चा जीव धोक्यात घालून कोणताही मोबदला मिळत नसतांना या कोरोना योद्धयांनी  केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या साथ रोगाच्या कालावधीत सेवाभावी वृत्तीने *श्याम पाटील*  व *प्रियंका प्रकाशलाल लधानी* यांनी केलेले काम खरोखर कौतुकास्पद आहे.
--------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines