अमळनेर - शहरातील साने नगर भागातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदीर येथे श्रावण महिन्यानिमित्त जळोद ते साने नगर अशी कावड यात्रा संपन्न झाली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत मोजक्या भक्तांचा या यात्रेत सहभाग होता.

दरवर्षाप्रमाणे या वर्षीही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी दि.२१ जुलै २०२० रोजी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिवभक्तांनी जळोद येथील तापी नदी मधून कलशात पाणी घेऊन पायी चालत साने नगर येथे पोहोचले व तेथे सिद्धेश्वर महादेवाला (सोन्याचा महादेव) जलाभिषेक करण्यात आला.
ही परंपरा या मंदिरात गेल्या ८ वर्षा पासून सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही शिव भक्तांनी सोशल डिस्टन्सीग ठेऊन कावड यात्रा या वर्षीही पूर्ण केली. या कावड यात्रेत नरेंद्र पाटील,वसंत पाटील,किशोर पाटील,जगदीश पाटील,ज्ञानेश्वर पाटील हे शिवभक्त सहभागी होते.
No comments
Post a Comment