अमळनेर - येथील नगरपरिषद हद्दीतील पाचपावली देवी चौक ते वड चौकापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झालेली होती.परीसरातील जनतेच्या प्रलंबित मागणीची दखल घेऊन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनी नगर पालिकेमार्फत सदर रस्ता रुंदीकरण,रस्ता दुभाजक,गटारीसह,काँक्रीटीकरण व विद्युतीकरणाचे काम टप्पा १ नुसार पाचपावली देवी मंदीर चौक,राज्यमार्ग १५ ते डाॅ.वैद्य यांचे हाॅस्पिटलपर्यंतचे काम पुर्णत्वास आल्यामुळे रस्त्याचे व पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,नगरपरिषद गटनेते प्रविण पाठक यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले.तद्नंतर परीसरातील व्यावसायिक व नागरीकांनी सदर विकास कामांबाबत समाधान व्यक्त करत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब संदानशिव,धनुभाऊ महाजन, पंकज चौधरी,विक्रांत पाटील, प्रशासन अधिकारी, श्री.संजय चौधरी,अभियंता श्री.संजय पाटील,आरोग्य निरीक्षक श्री.युवराज चव्हाण,जितेंद्र कटारीया,बाळू माने, दिपक मद्रासी, तसेच परीसरातील व्यापारी,नागरीक उपस्थित होते.
No comments
Post a Comment