----------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहराच्या अध्यात्मिक परंपरेचे एक केंद्र असलेल्या अमरीश ॠषी यांचा दरवर्षी साजरा करण्यात येणारा यात्रौत्सव काल होता. पण कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदीर संस्थानने घेतला होता. त्यामुळे फक्त विधीवत पुजाविधी करण्यात आला. शहर व तालुका वासियांचे आकर्षण ठरणारा व फक्त ५ ते ६ तासांची यात्रा असा लौकिक असलेला येथील अमरीश ऋषीं मंदिर संस्थानचा यात्रौत्सव यावर्षी काल दि.2 जुलै रोजी साजरा करण्यात येणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात होणारा उत्सव होणार नाही असे आधीच जाहीर करण्यात आले होते. पारंपारिक पद्धतीने सकाळी ध्वजारोहण होऊन पूजा व आरती करण्यात आली. शासकीय निर्देशानुसार कोरोनाच्या प्रभावामुळे यात्रा उत्सवाला परवानगी नसल्याने यात्रा रद्द करण्यात आली होती.त्यामुळे टेकडीचा परिसर सुना वाटत होता.
तरी काही उत्साही मंडळी दुपारनंतर टेकडीवर येतच होती. पण स्वतः पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आपल्या सहका-यांसह थांबून होते. त्यांनी या मंडळींना रस्त्यात अडवून परत जायला सांगितले. तर नियमांचे उल्लंघन करणा-या काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
---------------------------------------------------------------------------



ओम टी पान मसाला च्या नविन दालन
No comments
Post a Comment