पांझरा नदी काठावरील नागरिकांना आवाहन

Sunday, August 16, 2020

/ by Amalner Headlines
धुळे -
धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेला मालनगाव मध्यम प्रकल्प, ता. साक्री, जि. धुळे व जामखेडी मध्यम प्रकल्प, ता. साक्री, जि. धुळे हे प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून अनुक्रमे  १६१० व ४१९ क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे आज सकाळी ९ वाजता २ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले असून २०८० क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines