ऑनलाईन शिक्षण व डोळ्यांची काळजी या विषयावर नेत्रतज्ञ करणार मार्गदर्शन रोटरी क्लब अमळनेरतर्फे १८ ला संपन्न होणार उपक्रम

Sunday, August 16, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व जगात ऑनलाईन पध्दतीचा वापर सुरू आहे. यामुळे सर्वांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर खुप ताण येतआहे. याचा परिणाम डोळ्यांचे आजार उद्भवत असून वारंवार डाॅक्टराच्या सल्याची गरज निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने "ऑनलाईन शिक्षण घेतांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी " या विषयावर येथील नेत्र रोग तज्ञ रो. डाॅ. राहुल मुठे (श्री गणेश डोळ्यांचे हाॅस्पीटल,अमळनेर) हे फेसबुकच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.ही माहीतीपर क्लिप अमळनेर रोटरी क्लबच्या फेसबूक पेजवर  आपण दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून पाहू शकतात. दर्शकांनी  Facebook मधील "Rotary Club of Amalner 3030" या पेजवर पहावी. तसेच रोटरी क्लबच्या पदाधिका-यांच्या पेजवरही ही  माहिती पहाता येईल. या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रो.प्रतिक जैन (प्रोजेक्ट चेअरमन), रो.डाॅ.प्रतिम जैन (डायरेक्टर कम्यूनिटी - मेडीकल),रो.डाॅ.शरद बाविस्कर (डायरेक्टर कम्यूनिटी -मेडीकल), रो.अभिजीत भांडारकर( प्रेसिडेंट),रो. महेश पाटील ( क्लब सेक्रेटरी) यांनी केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines