अमळनेरात येत्या मंगळवारी जनता कर्फ्यु -पोळा सण असल्याने प्रशासनाने घेतला निर्णय फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने रहातील सुरू - इतर बाजार राहील बंद

Friday, August 14, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
  येथील उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांचे दालनात व्यापारी संघटना प्रतिनिधी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येत होता. पण या आठवड्यात मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी पोळा सण असल्याने सोमवार ऐवजी मंगळवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. मेडिकल्स् , रूग्णालय,कृषी विषयक सेवा पुरविणारी दुकाने,दुध विक्री या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी बांधवांनी शासन निर्देश पाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नपाच्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines