अमळनेर - देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोरोना आजारावर गुणकारी असलेला काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मोफत पातोंडा येथे वाटप करण्यात आला. याचा लाभ गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर झाला. यात संघाच्या सर्वच स्वयंसेवकांचे योगदान मोठ्या प्रमाणात लाभले. अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम स्वयंसेवकांनी केला.सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत सर्वांना मास्क लावून काढा वाटप करण्यात आला. कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे हा काढा आरोग्यदायक व उपयुक्त ठरत आहे. शासनाच्या आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेला हा काढा सर्दी,खोकला यावर लाभदायी असून नागरिकांनी मोठय़ा संख्येने लाभ घेतला. अश्या सामाजिक कार्यात नेहमीच नि:स्वार्थपणे आपले कार्य वर्षभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे याचे हे उत्तम उदाहरण पातोंडा गावात दिसून आले. या वेळी अमळनेर तालुका कार्यवाह हितेश शाह,पंडित नाईक,विजय पाटील, कमलेश आर्य हे कार्यक्रमास उपस्थित होते.

या उपक्रमात रोहित पवार, प्रणव बोरसे, शशिकांत पाटील,धीरज पाटील, प्रशांत लांबोळे,कृष्णा पाटील, स्वप्नील निंबाळकर, सतिश महाजन, निलेश भोई, जितेंद्र वाड़ीले, राहुल मोतीराळे, संजय महाले, राकेश पाटील, घनश्याम पाटील व राहुल पाटील या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
No comments
Post a Comment