अमळनेर - राज्यातील सुवर्ण व्यावसायिकांना शासनाच्या सुचनांचे मार्गदर्शन व त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर सहकार्य करणाऱ्या राज्य पातळीवरील संस्थेवर येथील युवा उद्योजक अथर्व मूकूंद विसपूते व भैय्या भाऊ भामरे,वैजापूरकर या दोन्ही सुवर्णकार व्यावसायिकांची निवड झाली आहे.
तालूका स्तरावरील व्यावसायिकांची जिल्ह्यातील ही एकमेव निवड आहे.अथर्व विसपूते यांची आय. बी.जे.ए.या संस्थेवर तर भैय्या भामरे यांची इंडीया ज्वेलरी फोरमच्या महाराष्ट्र राज्य डायरेक्टर बोर्डावर निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आय. बी.जे.ए. च्या राज्य संघटनेत खान्देशातून त्यांची एकमेव निवड झाली होती.आज ज्वेलरी फोरमवर त्यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र चेअरमन राकेश कूमार यांनी दिले आहे. या दोन्ही सुवर्णकार व्यापा-यांच्या निवडी बद्दल सराफ सोनार असोशियन व अहिर सुवर्णकार यूनियन व समाज बांधवांतर्फे त्यांचे अभिनंदन होत आहे.अथर्व हा राज्य सराफ असोशियनचे मूंकूंद विसपूते यांचा मूलगा असून भैय्या भामरे हे सोशल मिडीयाचे माध्यमातून राज्य व देश पातळीवरील व्यावसायिकांशी निगडीत आहेत.
No comments
Post a Comment