अमळनेर - येथील नपाच्या पूज्य सानेगुरुजी वरीष्ठ नोकरांच्या पतपेढीत दिनांक ५ ऑक्टोंबर २०२० रोजी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्यधिकारी डॉ.विद्या गायकवाड व नगरसेवक सर्वश्री मनोज बापू पाटील,श्याम पाटील,सुरेश पाटील,नरेंद्र संदानशिव यांच्या उपस्थितीत सभासदांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी साहेबराव पाटील यांनी पतपेढीच्या कामकाजाविषयी माहिती घेऊन राज्यात पतपेढ्या डबघाईला निघाल्या असतांना तुम्ही सभासदांना १९८८ पासून डिव्हिडंड व भेटवस्तू वाटप करीत आहेत असे म्हणून शाबासकी देऊन संचालक मंडळाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच मुख्याधिकारी डॉ.गायकवाड यांनी देखील प्रशंसा करून पतपेढीत नवीन काही योजना आणून संस्था आणखी चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी अभियंता श्री संजय पाटील,प्रशासन अधिकारी संजय चौधरी अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण,कीर्ती गाजरे, गणेश जाधव या कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात भेटवस्तूंचे वाटप नपा सभागृहात करण्यात आले

सदर प्रसंगी चेअरमन सोमचंद संदानशिव यांनी पतपेढी स्थापनेपासून ते आजपर्यंत पतपेढीबाबत सविस्तर माहिती सांगून सर्व संचालक मंडळाने सहकार्य केलेबाबत त्यांचे आभार मानले. यावेळी व्हॉइस चेअरमन ईश्वर पाटील, संचालक शेखर देशमुख,विजय बागुल,राधा नेतले,इकबाल पठाण,प्रसाद पाटील व सर्व सभासद हजर होते. कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अखेरीस श्री संजय चौधरी यांनी आभार मानले.
No comments
Post a Comment