तामसवाडी धरणाचे पाणी आरक्षित करावे अमळनेरच्या नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांची मागणी

Tuesday, October 6, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
शहरासह अमळनेर व पारोळा तालुक्यातील नदीकाठावरील गावांना पाणीपुरवठा करणा-या बोरी मध्यम प्रकल्प (तामसवाडी) ता.पारोळा येथे आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाणी साठा आरक्षित करण्यात यावा अशी मागणी अमळनेरच्या नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री,जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
         सध्या या प्रकल्पाचा एकूण जलसाठा ४०.३१ द.ल.घ.मी. असून प्रकल्पाच्या साचलेल्या गाळाच्या सर्व्हेक्षणानुसार ५.२२ द.ल.घ.मी. एवढी बोरी प्रकल्पाची जल क्षमता गाळ साचल्यामुळे कमी झालेली आहे. अमळनेर शहरासह पारोळा,बहादरपूर,महाळपूर,शिरसोदेसह बोरी नदीकाठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी प्रकल्पातून १३६ द.ल.घ.फु. पाणी उचल करण्यासाठी जलनियोजनात तरतूद आहे. सुदैवाने यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बोरी प्रकल्पाचा जलसाठा पुर्ण क्षमतेने भरलेला आहे. सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तथापि भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास आवश्यक उपाय योजनेसाठी बोरी प्रकल्प अहवालाच्या तरतूदीनुसार  अमळनेर नगरपरिषदेने  अमळनेरसाठी १८.८०द.ल.घ.फु. पाणी प्रकल्पातून उचलण्यासाठी बोरी प्रकल्पाच्या जल नियोजनातील तरतूदीनुसार पाणी आरक्षणासाठी जिल्हास्तरीय आकस्मित पाणी निश्चिती समितीने करावयाचे बिंगर सिंचन आरक्षण बैठकीत अमळनेर नगरपरिषद,अमळनेर आणि पारोळा शहरासह नदीकाठावरील गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी,गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines