अमळनेर न.पा.त अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्या फलकाचे अनावरण अध्यक्षपदी बिंदूकूमार सोनवणे,कार्याध्यक्ष रघुनाथ मोरे,जनरल सेक्रटरी राजेंद्र चंडाले यांची निवड

Tuesday, October 6, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - 
अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस कामगार संघटनेची अमळनेर नगरपरिषदेत स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी बिंदू सोनवणे, कार्याध्यक्ष रघुनाथ मोरे तर जनरल सेक्रेटरीपदी राजेंद्र चंडाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
          अमळनेर नगर परिषदेच्या आवारात संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, संघटनेचे प्रदेश महामंत्री दिलीप अण्णा   चांगरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष जितेंद्र चांगरे,प्रदेश संघटक श्रीमती आशाताई चावरिया,जिल्हाध्यक्ष सुनील पवार,ज्येष्ठ सल्लागार दयारामजी कसोटे,प्रीतम संगेले,किशोर जाधव, नंदलाल तेजी,
सुरेश भुरट,राजू जाधव,अशोक लहिरे,सुधीर बुलेट,रमेश संगले इत्यादी उपस्थित होते.
              अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेची अमळनेर नगरपालिका शाखेची कार्यकारणी  पुढील प्रमाणे:-
*अध्यक्ष* - बिंदुकुमार भानुदास सोनवणे, *कार्याध्यक्ष*- रघुनाथ रामभाऊ मोरे, *जनरल सेक्रेटरी*- राजेंद्र‌ आय. चंडाले, *उपाध्यक्ष*- नितीन कैलास लोहेरे, *कोषाध्यक्ष* - सचिन विष्णु काल्याणे, *जॉईंट सेक्रेटरी*- गणेश एन. नकवाल

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines