अमळनेर - अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर शाखेची ऑनलाईन मासिक बैठक नुकतीच घेण्यात आली. मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजयजी गायकवाड हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अमळनेर शाखेचे अध्यक्ष मकसूद बोहरी यांनी लोकशाही परंपरेला धरून व कोणत्याही पदाला न चिकटता आपल्या जागेवर सक्षम भगिनींची टीम तयार करून त्यांच्या हाती आपल्या पदाची सूत्रे आज रोजी सुपूर्द केली. नवीन कार्यकारिणीत सर्व महिला सदस्य आहेत. त्या खालील प्रमाणे -
नूतन अध्यक्षा -अॅड.भारती अग्रवाल,सचिव - सौ.कपिला मुठे,तालुका संघटक - सौ.करूणा मधुकर सोनार,तालुकासहसंघटक - सौ.मैहराज मकसूद बोहरी, कोषाध्यक्ष - सौ. मेधा हेमंत भांडारकर यांनी आपले पदभार स्वीकारले. कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ.वनश्री अविनाश अमृतकर, अॅड. उर्मिला जगदीश अग्रवाल, सौ. ज्योती पंकज भावसार, सौ. अंजू विजय ढवळे, सौ. ज्योती विनय जोशी व सौ. आरती दिनेश रेजा यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मंत्रालय मुंबई विकासजी महाजन,मकसूद बोहरी,राजेंद्र सुतार, जयंतीलाल वानखेडे,बापू चौधरी विजय शुक्ल,हेमंत भांडारकर,अजय पाटील,ताहा बुकवाला,सुनिल वाघ,गुरूनामल बठेजा, कदीर सादिक,मधुकर सोनार आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments
Post a Comment