रात्री नऊपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असोसिएशनची उपविभागीय अधिका-यांकडे मागणी

Tuesday, October 6, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
कोरोना आजाराने सुरू झालेल्या  लाॅकडाउनमुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेला व्यापार व्यवसाय आता सुरु झाला आहे. परंतु शहरात दुकाने,व्यापार,व्यावसायिक आस्थापना सांयकाळी सात वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे.ती वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.                                                                  
          आगामी काळात नवरात्र,
दसरा,दिवाळी,भाऊबीज या सणातील व्यावसायिक संधीचा विचार करून व्यवसांयाची वेळ किमान नऊपर्यंत करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असोसिएशनतर्फे  उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी,लोकनियुक्त नगराध्यक्षा,आमदार अनिल पाटील,माजी आमदार साहेबराव दादा ,माजी आमदार स्मिताताई वाघ,माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे.                                                    
           कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लाॅकडाउन केले.त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाॅकडाउन शिथील करण्यात आले.मात्र अद्याप व्यापार, व्यवसाय,आस्थापना सांयकाळी सात वाजेपर्यत सुरु आहेत. ते सातपर्यंत सुरू ठेवण्याऐवजी रात्री नऊपर्यंत सुरु ठेवाव्यात. यामुळे विशिष्ट वेळी होणारी गर्दी टळेल. आता पाचवे अनलाॅक सुरु झालेले आहे. त्यात मागील आठवड्यापासून शहरातील बाधित रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ९० ट्क्यांपर्यत रिकवरी जिल्ह्यात झालेली असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या मागणीच्या सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष झामनदास सफरमल सैनानी,उपाध्यक्ष नंदलाल भावसार,कार्याध्यक्ष विशाल शर्मा, सचिव चंद्रकांत शिरोडे,सहसचिव हरेश नागदेव,कार्यकारी सदस्य  महेश वाणी,राजुसेठ जैन, अशोक पाटील,निलेश कोळी,पंकज वाणी,महावीर जैन,रमेशसेठ लुल्ला,आदेश पारख,गणेशसेठ छाजेड,इंदरचद छगनलाल, आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines