अमळनेर - अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर व दाऊदी बोहरा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू प्लॉट भागातील समाज बांधवांचे व परिसरातील नागरिकांचे कोविड-१९ रॅपिड अॅटीजेन टेस्ट( Rapid Antigen Test) तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने १३३ नागरिकांची बोहरा जमात खाना येथे तपासणी करण्यात आली. शासनाच्या "आपले कुटुंब आपली जबाबदारी" या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी उपस्थित मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांचे स्वागत बोहरा समाजाचे अध्यक्ष शेख अहेसानभाई बुर्हानी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सचिव सौ. कपिला मुठे यांनी केले. आभार प्रदर्शन बोहरा समाजाचे सचिव मोहम्मद करमपुरवाला यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक श्री निशांत अग्रवाल व नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्री संजय चौधरी हे उपस्थित होते. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेलकर व डॉ.विलास महाजन यांनी तपासणी केली. ग्राहक पंचायतीतर्फे सचिव सौ.कपिला मुठे, संघटक सौ. करुणा सोनार, सहसंघटक सौ. मेहराज बोहरी, सौ वनश्री अमृतकर, सौ.अंजू ढवळे, मधुकर सोनार, ताहा बुकवाला, योगेश पाने, कदीर सादिक, विजय शुक्ल तर बोहरा समाजातर्फे समीना बुर्हानी, अहमद बुरहानी, हुझेफा आझाद, अलीअसगर बोहरी आदींनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सदर कार्यक्रम आमिल साहेब शेख अजीज भाई हिंदी यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला होता अशी माहिती पी. आर. ओ. मकसूद बोहरी यांनी दिली.
No comments
Post a Comment