=======================================
===================================
अमळनेर - ग्रामस्तरावर येऊन शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देता यावा या हेतूने शासनाने महाराजस्व अभियान समाधान योजना ग्रामीण भागात सुरू केली आहे. त्यात असलेल्या सर्व योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी नगाव खुर्द येथे केले. नगाव खु येथे शनिवारी दुपारी तालुक्यातील महाराजस्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, प्रांताधिकारी सीमा अहिरे, डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक पोटोडे, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, सरपंच प्रेरणा बोरसे, उपसरपंच कोकिळाबाई गोसावी, सरपंच महेश पाटील, माजी सरपंच प्रा.तुषार पाटील, प्रविणगीर गोसावी, केशव पाटील, काशिनाथ दयाराम पाटील, रोहित पाटील,छोटु प्रल्हाद पाटील, संतोष आत्माराम पाटील, उत्तम शेनपडू पाटील, महिला बचत गटाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष,सर्व महिला सदस्य आदी यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, स्वस्त धान्य दुकानाचे रेशन कार्ड देण्यात आले. तर संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच शासकीय अनुदानातून हरभरा बियाणे देखील वाटप करण्यात आले. शासनाने १ एप्रिल पासून हे अभियान सुरू केले. मात्र कोरोनामुळे अभियानाचा शुभारंभ करता आला नाही. आता मात्र अभियान सुरू करण्यात आले असुन महाराजस्व अभियानात तहसीलदार, प्रांत यांनी कमतरता वाटेल अशा गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा. विविध घटकांना २५ ते २७ योजनांचा लाभ द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यासाठी संजय निराधार कमिटीची स्थापना करून द्यावी जेणेकरून दोन अडीच हजार प्रकरणे साचले आहेत त्यांचा निपटारा करण्यात येईल त्यासाठी समिती गठीत करा व त्वरित मान्यता द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. समस्या जागीच सोडविण्याचा प्रयत्न असेल. माहिती घ्यावी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा,चकरा कमी होतील यासाठी कागदपत्रे जमा झाल्यावर लाभ लवकरात लवकर कसा देता येईल याबाबत आपण दक्षता घेणार आहोत असे आमदार पाटील म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यावेळी म्हणाले की कोरोनासारख्या इतक्या गंभीर परिस्थितीत देखील आपण कॅम्प घेतला, सुरुवात चांगली केली. आता तालुक्याची एकच जबाबदारी आहे यात तालुका एक नंबरवर ठेवा, बिनशेती परवानग्या, शर्त भंग असे इतर कार्यक्रम आपण घेऊ शकतो. गावांनी यातून विविध अभियान राबवा. तर वृक्षारोपण अभियानाच्या कामाच्या मान्यता प्रत जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या. त्यात वृक्षारोपण करून पुढचे तीन वर्षे जगवा व सर्व गावकरी उत्साहाने सहभागी व्हा. गावात लोकाभिमुख प्रशासन राबवता येईल यासाठी सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी ग्रामस्थांना केले.
================================
No comments
Post a Comment