°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अमळनेर - येथील भारतीय जनता पार्टीतर्फे कपिलेश्वर मंदिराबाहेर वीज बिलांची होळी करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील मविआ सरकारने जनतेला वाढीव वीजबिले देऊन त्यात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या सरकारच्या विरोधात वीज बिलांची होळी करून भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.देशाबरोबर जगावर पसरलेल्या कोरोना महामारी मुळे जनतेला कामधंदा बंद करून घरात थांबावे लागले. या संकटात जनतेला राज्य सरकारने मदत तर अजीबात केली नाही,उलट अव्वाच्या सव्वा विज बीलं जनतेला पाठवली. कामधंदा नसल्याने सर्व सामान्य जनतेला पाठवलेले हे विज बील म्हणजे फारच मोठे आर्थिक संकट आहे. हि बिले पुर्ण माफ करण्यात यावेत म्हणून मा.आ. स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात कपीलेश्वर महादेव मंदिर,नीम (कपीलेश्वर)
येथे लाईट बील माफ न करणाऱ्या आघाडी बिघाडी सरकारचा निषेध नोंदवून विज बीलांची होळी करण्यात आली. याप्रसंगी मा.आ. स्मिताताई वाघ, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,पं.स. सभापती रेखाताई पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, राहुल पाटील व बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments
Post a Comment