अमळनेर - येथील देशमुख बंगला परिसरात प्रभाग क्र.१३ मधील नवमतदारांसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन मधुकर खंडारे यांच्या प्रयत्नांतून नोंदणी अभियान राबविण्यात आले.
सचिन भाऊ मित्र परिवाराच्या वतीने नविन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करणात आले. या दोन दिवसीय नवीन मतदार नोंदणी मोहीमेला भरपुर व अप्रतिम असा प्रतिसाद प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात येरझाऱ्या न मारता नवीन मतदारांना त्यांच्याच दारी मतदान नोंदणीची सोय करून दिल्याबद्दल येथील प्रभागवासियांनी खास करून सचिन भाऊ खंडारे व मित्र परीवाराचे विशेष कौतुक केले व आभार मानले. नवीन मतदार नोंदणी उपक्रम चांगला यशस्वी ठरला असुन मतदार नोंदणी प्रक्रिया संपूर्णपणे सोशल डिस्टन्स ठेवून व मास्क वापरून राबविण्यात आली.मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करणाऱ्याचे सचिन खंडारे यांनी आभार मानले.

नवीन मतदार नोंदणी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर आप्पा खंडारे,ईश्वर देशमुख,
राकेश पाटील,गुलाब देशमुख (माजी फौजी),भिमराव संदानशिव,उमेश भैय्या पाटील,लोटन पाटील,भुपेद्र देशमुख,जितेंद्र पाटील,बाळा जोशी,दिपक चौधरी,महेश पाटील,राकेश भावसार,चेतन पाटील,मनोज पाटील,सौरभ पाटील,मयुर भावसार,रोहित देशमुख,अमय संदानशिव,स्वप्निल गोरे,तेजस पाटील,गिरिष शिंगाणे,आदित्य देशमुख,कुणाल चौधरी यांनी परीश्रम घेतले
No comments
Post a Comment