मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर - आजपासून अमळनेर तालुक्यात आचारसंहिता लागू आचारसंहितेचा भंग केल्यास होणार कायदेशीर कारवाई - तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

Friday, December 11, 2020

/ by Amalner Headlines

अमळनेर -
राज्यातील मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज जाहीर करण्यात आल्या आहेत.  कार्यक्रमानुसार ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या २९ नोव्हेंबरच्या पत्रानुसार ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत. त्या संपुर्ण तालुक्यात आचारसंहिता लागु राहील. 
                    त्यानुसार अमळनेर तालुक्यातील एकुण ११९ पैकी ६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने, अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व त्यामध्ये समाविष्ठ गावांना आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासुन निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील. 
      राज्य निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिते बाबतच्या सुचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधीतांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी गांभिर्याने नोंद घ्यावी असा इशारा अमळनेरचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines