भरवस गावाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन पांझरा नदीतून येणार पाईपलाईन,दूर होणार पाणीटंचाई

Sunday, December 6, 2020

/ by Amalner Headlines
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
               - * जाहीरात * -
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर -
राष्ट्रीय पेयजल योजनेतून तालुक्यातील भरवस गावाला ८ किमी वरून पांझरा नदीवरील कळंबु या गावाजवळ कोल्हापूर बंधाऱ्याजवळून नव्याने होत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळणार आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
              राष्ट्रीय पेयजल योजनेत   ७० लाख रुपये खर्च करून नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले. यात जलवाहिनीचे काम हे भरवस ते कळंबु या अंतरात सुरू झाले आहे. तर विहीर, विद्युतपंप, पंपगृह अशा सुविधा देखील पांझरा नदीच्या काठावर करण्यात येणार आहे. या योजनेमुळे कायम पाणी टंचाई असलेल्या भरवस गावाची पाणी टंचाई दूर होणार आहे.
        या भूमिपूजन कार्यक्रमास आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सोबत तलवाडेचे सरपंच रामकृष्ण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डाॅ. रामराव पाटील, सरपंच अशोक पाटील, जेष्ठ नागरिक नारायण पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष,खा.शि.मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी,लायन्स क्लबचे अध्यक्ष, अभ्यासू पत्रकार व आमचे मार्गदर्शक श्री डिगंबर महाले सर यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाइन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,उपसंपादक रोहित बठेजा
--------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines