•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर - तालुक्यातील मारवड येथील करण साळुंखे याची राज्यस्तरीय युवा कबड्डी लीगच्या निवड चाचणीत निवड झाल्याने आ.अनिल पाटील यांनी त्याचा घरी जाऊन सत्कार केला. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंच्या कला गुणांना वाव देण्यासाठी मुरलीधर माळी यांच्याकडून राज्यस्तरीय युवा कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले आहे. प्रो कबड्डी या राष्ट्रीय स्पर्धेसारखे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीत चि.करण सुनिल साळुंखे याने उत्कृष्ट खेळ करत निवड पक्की केली होती. त्याच्या या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मारवड येथे भेट देत त्याचा सत्कार केला. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी करणला मोठा खेळाडू हो असा आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत रा.कॉ.तालुकाध्यक्ष सचिनपाटील,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत साळुंखे, पत्रकार डॉ. विलास पाटील, उपसरपंच बी.डी. पाटील, नरेंद्र साळुंखे, गोकुळ फकिरा साळुंखे, प्रकाश साळुंखे, दिलीप साळुंखे, नरेंद्र पाटील (गोवर्धन), दिनेश साळुंखे, नाना सोनवणे, उमेश सुर्वे, भिकण सिद्धपूरे, रविंद्र साळुंखे, सचिन बेहरे, करणचे आजोबा प्रभाकर मोतीराम साळुंखे, वडील सुनिल प्रभाकर साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अमळनेर येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष,खा.शि.मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी,लायन्स क्लबचे अध्यक्ष, अभ्यासू पत्रकार व आमचे मार्गदर्शक श्री डिगंबर महाले सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाइन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,उपसंपादक रोहित बठेजा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments
Post a Comment