शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियानात नपाचा सहभाग आठवड्यातून एक दिवस 'नो व्हेईकल डे' पाळण्याचे अमळनेर नपाचे आवाहन पदाधिकारी व अधिका-यांनी शहरात फिरून जनतेला केले आवाहन

Monday, December 7, 2020

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * - 
--------------------------------------------------------------------
अमळनेर -
शासनाच्या 'माझी वसुंधरा' या अभियानात अमळनेर  नगर परिषदेने सहभाग घेतला आहे. या अभियानाच्या निमित्ताने शहरात आठवड्यात एक दिवस असे दर सोमवारी अमळनेर शहरात 'नो व्हेईकल डे' पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज या अभियानाची सुरूवात करण्यात आली. त्या निमित्त आज सकाळी नपाच्या पदाधिकारी व अधिका-यांनी शहरात फिरून जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले.
                   याबाबत अमळनेर नगरपरिषदेने एक पत्रक प्रसिद्ध करून म्हटले आहे की,राज्य शासनाने"माझी वसुंधरा"हे अभियान हाती घेतले असून सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने पर्यावरण पूरक उपक्रम स्वछ सुंदर प्रदूषणमुक्त  हवेच्या उपलब्धतेसाठी हरित ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे.यासाठी सर्व नागरिकांनी अमळनेर न.पा.स सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी यांनी केले आहे.
            आज दि.७ डिसेंबर रोजी सकाळी नपाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी शहरात फिरून 'नो व्हेईकल डे' पाळण्याचे जनतेला आवाहन केले. पू.साने गुरुजी पुतळा, सुभाष चौक, कुंटे रोड,धुळे रोड,लालबाग शॉपिंग सेंटर,  न.पा.कार्यालय या परिसरात नागरिकांना आवाहन करण्यात आले. याप्रसंगी मा.आ.कृषीभुषण साहेबराव पाटील,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील,नगरसेवक सुरेश पाटील,महेश पाटील,श्याम पाटील,प्रशासन अधिकारी संजय चौधरी,पत्रकार किरण पाटील,अनिल बेडवाल,प्रंशात ठाकुर,बलराम हटवाल,संतोश संदानशिव,अवि संदानशिव,प्रसाद शर्मा,सोमचंद संदानशिव आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.
--------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines