अमळनेर - राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचा आज दि.१२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने खा.पवार व्हिडिओ कॉन्फररन्सद्वारे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर शहरात जी.एस. हायस्कुलमधील आयएमए हॉलमध्ये आज दि.१२ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शरदचंद्र पवार मुंबई येथून कार्यकर्त्यांशी थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधणार आहेत. तरी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या जाहीर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला शहराध्यक्ष आशा चावरीया,
No comments
Post a Comment