दैनंदिन व्यापार,व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू रहाणार
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - जिल्ह्यासह राज्यात मागील काही दिवसात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार फक्त सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिका-यांनी दिला आहे. जिल्ह्यात कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाच्या निर्देशांनुसार जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी नागरिकांसाठी दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी नियमावली जाहीर केली आहे. त्यात दि. ६ मार्चपर्यंत जिल्ह्यात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्यात यावेत असा आदेश देण्यात आला आहे. या आदेशानुसार दि. १ मार्च सोमवार रोजीचा अमळनेर येथील फक्त आठवडे बाजार बंद राहील. या व्यतिरिक्त दररोजचे व्यवहार कोविड -१९ च्या नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील असे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी दि.२२ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. व्यापारी,व्यावसायिक व नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment