-------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून २५१५ या विशेष योजनेतून ७ लाख रुपये खर्चाच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सप्तश्रृंगी मंदीर परिसरात गुरुवारी संपन्न झाले. यावेळी परिसरातील विविध गावांचे कार्यकर्ते व सरपंच,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या २५१५ या विशेष निधीतून आमदार अनिल पाटील यांनी खेडी व्यवहारदळे या गावातील मंदिराच्या सभा मंडपासाठी निधी आणून दिला याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी येत्या काळात मतदार संघातील अधिकाधिक गावांना जास्तीत जास्त निधी मिळवून देणार व मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरूच ठेवणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.

या भूमिपूजन कार्यक्रमास
खेडी व्यवहारदळे येथील उपसरपंच उखा पाटील, संदीप पाटील, निंबा पाटील, नानाभाऊ पाटील, अशोक पाटील, भागवत पाटील, कल्याणराव पाटील, भगवान पाटील, शिवाजी पाटील, लक्ष्मण पाटील, सुधाकर पाटील, सुनील पाटील, नितीन पाटील, पांडुरंग पाटील, उमेश पाटील, लखीचंद पाटील, कांतीलाल पाटील, रवींद्र पाटील, हरीलाल वंजारी, चतरू वंजारी, किरण गजरे, रोहिदास पाटील, नामदेव मालचे, सुरेश पाटील, मच्छिंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, हिंमत पाटील निंभोरा, महारू पाटील ढेकू, ज्ञानेश्वर पाटील टाकरखेडा, समाधान पाटील, सुनील पाटील, अविनाश जाधव, गजेंद्र जाधव रामेश्वर, देवीदास देसले अमळनेर, डॉ.रविंद्र पाटील ढेकू, डॉ.एस.ए.सूर्यवंशी रामेश्वर, हिरालाल महाराज दापोरी आदी यावेळी उपस्थित होते
No comments
Post a Comment