-------------------------------------------------------------------
अमळनेर - भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार स्मिताताई वाघ यांची आज निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या निवडीची आज घोषणा केली. श्रीमती स्मिताताई वाघ यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा,विधान परिषद सदस्य,भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,भाजपा प्रदेश चिटणीस या पदावर कार्य केले आहे. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
No comments
Post a Comment