खानदेशातील चारधाम यात्रा आयोजकांची अमळनेर येथे बैठक संपन्न यात्रा आयोजनातील अडचणींवर झाली चर्चा

Saturday, March 20, 2021

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------
                     - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -  खान्देशातील चारधाम यात्रा आयोजकांना येणाऱ्या अडीअडचणीबाबत  नंदुरबार,धुळे,जळगाव  विभागातील (खान्देश ग्रुप )यात्रा आयोजकांची बैठक आज दि. १९ रोजी अमळनेर येथील गायत्री मंदिरात संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आली.
     या बैठकीस शहादा,धुळे,मालपुर,कापडणे,तासखेडा,पारोळा,मुकटी,साक्री,भडणे,शिरपुर,अमळनेर,जळगाव येथील यात्रा आयोजकांची उपस्थिती होती.  सदर बैठकीत प्रत्येक यात्रेचे माहीती पत्रकामध्ये सर्वांचे रूट व तिर्थक्षेत्र (गावे )सारखे राहतील, त्यात प्रवासाचे भाडे सुद्धा सर्व तिन्ही जिल्ह्यातील यात्रा आयोजकांचे सारखे राहतील, नेपाळ किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी फारच अडचणी येतात. म्हणुन त्या स्थळांचा खर्च हा  प्रत्येक आयोजकांनी अधिक घ्यावा. यात्रा काळात वाहतूक पोलीस किंवा परिवहन अधिकारी यांच्या त्रासाविषयी चर्चा झाली. तसेच सदर सर्व यात्रा ह्या भोजनासह असल्यामुळे गॅस सिंलेडर सोबत घेउन जाता यावे म्हणुन शासन दरबारी पाठपुरावा कसा करता येईल याविषयी विचार विनिमय करण्यात आला.  तसेच बरेच मंडळी विशेषतः  ठराविक किर्तनकार मंडळी कमी पैशात यात्रा आयोजन करून  लोकांची दिशाभुल करून यात्रेला नेतात पण रस्त्यात ही मंडळी यात्रेकरूंचे कसे हाल करतात त्या व्हिडीओ क्लिप सर्व ग्रुप मध्ये मुद्देसुद रूपाने पुराव्यासह त्या व्हायरल करणे किंवा त्याला सर्व ग्रुप मधील सदस्य त्यांची भेट घेउन त्यांच्या घरी किंवा किर्तन कार असेल तर त्याच ठिकाणी त्याला समज वजा सुचना देणे. ही मंडळी सदर यात्रेत अन्नदानाच्या नावाने ५ हजार,१० हजार, ११ हजार आणी गावातुन अन्न धान्य पंगतीच्या नावाने जमा करतात. यांच्या या पैसे जमवण्याच्या पद्धतीस आळा कसा घालता येईल या विषयी सल्ला मसलत करण्यात आली, काही मंडळी पत्रकात लिहीतात सदर यात्रा काढणे आमचा व्यवसाय नसुन सेवा आहे, अश्या आयोजकांना  प्रत्येक यात्रा आयोजकांनी सेवा करण्यासाठी आमंत्रण देउन सेवेची संधी देण्याचे ठरले. तसेच लवकरच संघटना ही रजीस्टर करण्यासाठी सर्व एकमताने ठराव झाला. 
              सदर बैठकीस श्री विलास देशपांडे(जळगाव),श्री रमेश कासार (शिरपुर),श्री नरेंद्रे (मून्ना) सोनार(अमळनेर) यांनी मार्गदर्शन व बैठकीचे नियोजन केले. यावेळी विश्वास ठाकूर, संजय पाटील, बद्रीप्रसाद जाधव,  (धूळे), अश्विन गोसावी (कापडणे), राजेंद्र पाटील, संजय चौधरी, रमेश कूंभार (पारोळा) लोटन पाटील, ईश्वर पाटील (मूकटी) राहूल भामरे (मालपूर) खूशाल परदेशी,समिर गोसावी (शहादा) प्रदिप पाटील (तासखेडा) सूनिल सोनार,रविंद्र चौधरी,अमोल पाटील (अमळनेर) आदिंची उपस्थिती होती.
-----------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines