-------------------------------------------------------------------
अमळनेर - चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा तृतीय वर्षाचा विद्यार्धी रोहित संतोष पाटील याने २०२१ मध्ये झालेल्या जी - पॅट (G - PAT) परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले आहे.तो आपल्या महाविद्यालयात तिसऱ्या क्रमांकाने तर अमळनेर तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. तो पत्रकार संतोष पाटील यांचा मुलगा आहे.
संस्थेचे अध्यक्ष व जळगाव जिल्हा काँग्रेसचे अधक्ष अॅड. संदीप भैय्या पाटील,जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हितेश सुभाषराव पाटील,गोदावरी फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील व काँग्रेस महिला जिल्हाअध्यक्ष सुलोचना वाघ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.तसेच बहादरवाडी परिसरातूनही रोहितचे अभिनंदन होत आहे.
No comments
Post a Comment