---------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------
अमळनेर - राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, कुणालाही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारणार नाही, सर्वांनी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन आपल्या आरोग्यासाठी सर्वांनी काळजी घेवू या असे आवाहन भाजपा नेत्या माजी आमदार स्मिता ताई वाघ यांनी केले आहे. आज दि.२६ मार्च रोजी स्मिताताईंचा वाढदिवस आहे. दरवर्षी कार्यकर्ते व समर्थक उत्साहात वाढदिवस साजरा असतात. पण या वर्षी असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे.
मा.आ. स्मिताताई वाघ आपल्या आवाहनात म्हणतात की, माझ्या प्रती हितचिंतकाचे असलेले स्नेहाचे धागे हे पक्के आहेत, आपल्या शुभेच्छा सतत माझ्या पाठीमागे असून आपले नाते हे औपचारिकतेच्या पलीकडचे आहे आणि आपल्या पाठिंब्यामुळेच आज मोठ - मोठ्या संकटांवर मात करून माझा प्रवास सुरू आहे. तसेच वाढदिवस हे केवळ निमित्त असून आपले आशिर्वाद, प्रेम हे सदैव माझ्या सोबत आहे. त्यामुळे केवळ व्हॉटसॲप, फेसबुक, मेसेज व दूरध्वनीवरुन शुभेच्छा द्याव्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे, त्या नियमावलीचे सर्व नागरिकांनी पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. तसेच शासनाने आखून दिलेल्या नियमावलीप्रमाणे ४५ ते ६० वयोगटातील सव्याधी असणाऱ्या नागरिकांनी व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही मा.आ. स्मिताताई वाघ यांनी केले आहे. अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे स्मिताताई वाघ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
No comments
Post a Comment