----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
अमळनेर - सध्या जिल्ह्यात कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना कोविड प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नपाच्या अतिक्रमण विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आजही काही दुकानदारांवर कारवाई करण्यात आलीच पण या कारवाईच्या बडग्यातून नपाचे कर्मचारीही सुटले नाहीत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सर्वांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे,मास्कचा वापर करणे या नियमाचा आग्रह केला जात आहे. आज अमळनेर शहरातील सुदीप मेडिकल,किशोर चौधरी,योगेश पाटील,कोमल मेडिकल,गायत्री ट्रॅव्हल,प्रभात रेस्टॉरंट,धवल ऑटो,हेमंत महाजन,महालक्ष्मी स्वीटस् ,अनिल पोहा,कमलेश कोचर या दुकानदारांना दंड करण्यात आला.

तसेच कार्यालयीन कामकाज करतांना मास्क न वापरणा-या काही नपा कर्मचा-यांनाही या नियमानुसार दंड करण्यात आला.यात मोती गजरे,भानुदास चौधरी,फिरोज पठाण,साजिद शेख आदींना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. अमळनेर नपाचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड, नपाच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाने वरील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी २०० किंवा ५०० रुपये प्रमाणे दंड केला आहे.
आवाहन
अमळनेर शहर व तालुक्यात अजूनही कोरोना आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सींग पाळावे,मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment